मुखेड प्रतीनिधी :ज्ञानेश्वर कागणे हिब्बटकर दि. २५ :
आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने घरकुल,रोहयो चा विषय घेऊन नांदेड जिल्हा परिषदेच्या गेटवर १ तास धरणे आंदोलन करण्यात आले.घरकुल,रोहयो कामाची मागणी,बचत गटाच्या मागण्यांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला,या नंतर प्रशासनाच्या वतीने कोणीही चर्चेला आले नसल्यामुळे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिन कडे मोर्चा वळविला. पूर्ण जिल्हा परिषद कार्यालय मजुरांच्या घोषणेने दणाणून गेला. अर्धा तासानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून मजुरांच्या मागण्या व निवेदन घेण्यासाठी खाली येण्याचे आश्वासन दिले.
संघटनेच्या शिष्टमंडळासोबत मजुरांच्या समोर प्रशासनाने १ तास चर्चा करून स्थानिक विषय लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले,धोरणात्मक मुद्दे शासनाला लेखी कळविण्याचे पत्र संघटनेला देण्यात आले. या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेगवेगळ्या गावातून ५०० लोकांची उपस्थिती होती.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड विनोद गोविंदवार,जिल्हा सचिव अंकुश अंबुलगेकर,जिल्हा कमिटी सदस्य माधव देशटवाड,सरुबाई सुर्वेसर,माणिक गोनशेटवाड,रावसाहेब शिंदे,सूर्यकांत बडूरे,पंढरी देशटवाड,,रामराव यामावाड,राजू वाघमारे, बालाजी कल्याणपाड, वर्धिनी सविता ताई गायकवाड यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
एसएफआयचे नांदेड जिल्हा सहसचिव कॉ.शंकर बादावाड यांनी आंदोलनास पाठींबा दिला.