कुंडलवाडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विकासासाठी लक्ष्मणराव ठक्करवाड तर्फे पाच लक्ष निधी प्राप्त.

दिलेले वचन पाळले ‘मोहम्मद अफजल’ यांच्या प्रयत्नाला यश.

कुंडलवाडी– रुपेश साठे दि.०७ :
कुंडलवाडी जिल्हा परिषद हायस्कूल ऊर्दू मराठी माध्यम शाळेचा विकासासाठी जिल्हा परिषद आरळी सर्कल सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या निधीतून पाच लक्ष निधी प्राप्त झाले असून शाळेचा विकासासाठी आपल्या जिल्हा परिषद निधीतून निधी उपलब्ध करून द्यावे. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल यांनी त्यांच्याकडे आग्रह केला होता.त्यांनी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.आणि दिलेले आश्वासन पाळत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल उपाध्यक्ष सय्यद फारूख पट्टेदार व सर्व समितीचे सदस्य तसेच शिक्षकवृंद त्यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद सर्कल आरळी अंतर्गत येणा-या कुंडलवाडी जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक आरोग्य केंद्राचा विकासासाठी विकासाभिमूख नेतृत्व असलेले जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे विशेष लक्ष असते.ठक्करवाड यांच्यातर्फे यापूर्वी दहा लक्ष निधी शाळेला मिळाले होते.त्यातून शाळेची सुरक्षाभिंत व रंगरंगोटी,पिण्याचा पाण्याची व्यवस्था आदी विकास कामे करण्यात आले.व शिल्लक सुरक्षाभिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी वजा आग्रह करण्यात आले होते.त्यानुसार त्यांनी आपल्या जिल्हा परिषद निधीतून पुन्हा पाच लक्ष निधी उपलब्ध करून दिले.
तसेच शाळेला मागील काळात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत केंद्र शासनातर्फे निधी उपलब्ध झाले होते.पण जागे आभावी निधी परत गेला होता.परंतू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष,मुख्याध्यापक यांनी उर्दू माध्यम शाळा परिसरातील जागा शाळा बांधकामासाठी उपलब्ध असून त्याठिकाणी नुतन ईमारत बांधकाम करण्यात यावे.परत गेलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावे आणि ईमारत बांधकाम रिटेन्डर काढण्यात यावे अशी मागणीधरून बसले होते.यातही जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी वारंवार पाठपुरावा करून गेलेला निधी पुन्हा उपलब्ध करून दिले होते.त्यातून नुतन ईमारत बांधकाम पुर्ण झाले.ही ईमारत उदघाटनाचा प्रतिक्षेत आहे.लवकरच नुतन शाळा ईमारतीचे लोकार्पण व उपलब्ध पाच लक्ष निधीतून शिल्लक सुरक्षाभिंत बांधकाम भूमीपूजन करण्यात येणार असल्यांची माहित मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद अफझल ,उपाध्यक्ष सय्यद फारूख पट्टेदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *