ज्यांना शेती अथवा बैल नाहीत त्या घरांमध्ये ही मातीच्या बैलांची पूजा करून पोळा सण उत्साहात साजरा केले .
कुंडलवाडी– रुपेश साठे दि. ०८ : कुंडलवाडी शहरासह संपूर्ण परिसरातील शेतकरी राज्याच्या लाडक्या सवंगड्याचा बैल पोळा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.बैलां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बैलपोळा या कडे पाहिले जाते ग्रामीण भागासह शहरी भागात शेतकरी वर्गाच्या वतीने मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून व पोलीस बंदोबस्तात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.पोळा सणाच्या पूर्व संध्ये ला बैलांना बैल पोळ्याच्या निमित्ताने बैल मालकांच्या वतीने त्यांना या सणाचे आमंत्रण दिले जाते व वर्षभर शेताची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या व शेतात राबणाऱ्या बैलला पोळा सणाच्या दिवशी शेती कामापासून दूर ठेवले जाते.या दिवशी सकाळी बैलांना नदी,विहीर,ओढ्यावर पाणी असेल त्या ठिकाणी नेऊन उटणे लावून स्वच्छ अंघोळ घातली जाते त्यांच्या शिंगांना रंगवले जाते व त्यानंतर त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. व नंतर गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते आणि गावातील देव मंदिरांना प्रदक्षिणा घालून परत घरी नेऊन शेतातील शेती कामातील अवजारं अवजारां बरोबर बैल-गाईची पूजा करू त्यांना गोड पुरणपोळीचा नैवद्य चारला जातो.
शेती कामातील बैलांचे होत आहे कमी महत्त्व.
बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा व आनंदाचा असतो.शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलावर अवलंबून असायचा.शेतातील नांगरणी, वकर्णी,पाळी,पेरणी,कोळपणी आदी व इतर कामासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे परंतु शेती करण्याची आवड व शेतात काम करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे शेतातील कामे करण्यासाठी बैलांचा वापर कमी होत असून शेतातील कामाकरिता लागणारा वेळ पैसा वाचवण्यासाठी बऱ्या पैकी बैलांची जागा आता ट्रॅक्टर सारख्या यंत्राने घेतली आहे.