कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे दि. २० :
कुंडलवाडी शहरातील श्री गणेश मंडळानी सकाळपासून श्री विसर्जनाच्या तयारीला लागले शहरातील नांदेडबेस येथील थोर तलाव व काही गोदावरी नदी येथे गणेश विसर्जन डी.जे.विरहित भजन व पारंपरिक पद्धतीने उत्साहाने व शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनाला चांगला प्रकारे सहकार्य केले.
यावेळी बिलोलीचे तहसीलदार तथा दंडाधिकारी कैलासचंद्र वाघमारे,नायब तहसिलदार आर.जी.चौव्हान,नायब तहसिलदार हादेशवार शंकर नरसिमलू,न.प.मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, न.प. नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार,
उपनगराध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,नगरसेवक शेख मुखत्यार,सुरेश कोंडावार,व्यंकट श्रीरामे, सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,पत्रकार कल्याण गायकवाड,सिध्दार्थ कांबळे,रूपेश साठे,अमरनाथ कांबळे,मंडळ अधिकारी एल.जी.तोटावार,तलाठी मोताळे,
तलाठी बी.एन.बिराजदार,विश्वास लटपटे,
सुभाष निरावार,गंगाधर पत्की,मुंजाजी रेनगड्डे,विरशेन क्षीरसाट,प्रतिक मालवंदे,हेमचंद्र वाघमारे,शंकर जायेवार,प्रकाश भोरे,मारोती करपे,मोहन कंपाळे,धोडिंबा वाघमारे,गंगाधर बसापुरे,शंकर मुक्केरवार,रामा वाघमारे,रोहित हातोडे उपस्थित होते.तसेच महावितरण कंपनीचे अभियंता व कर्मचारी श्री विसर्जनात विद्यूत बंद पडूनये म्हणून जातीने लक्ष दिले.
यावेळी पोलीस कर्मचारी गजानन अनमुलवार,तैनात बेग,इद्रिस बेग,गणेश गंधकवाड,शेख नजीर,दिलीप जाधव,नागेंद्र कांबळे,महेश माकूलवार,यांच्यासह होमगार्ड, शहरात श्री विसर्जनाच्या काळात कसल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडूनये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण व विशाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले.
Post Views: 370