देगलूर:-देशासह संपूर्ण जगात मागील दोन वर्षात कोरोना या रोगाने थैमान घातला असून या रोगामुळे देशात जीवितहानी मोठ्याप्रमाणात झालीच आहे पण हजारो लोकांवर आज बेरोजगारी ची वेळ आली आहे. कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध कायद्याअंतर्गत दोन वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालय बंद असुन सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.
देगलूर तालुक्यातील सर्व खाजगी कायम विनाअनुदानित शाळेच्या संस्थाचालकांनी सक्तीने जादा शुल्क आकारत आहेत यामुळे पालकांची आर्थिक पिळवणूक होत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याची देखल घेत राजसाहेब यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, सचिव प्रवीण मंगनाळे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष सुभास भंडारे यांच्या नेतृत्वाखाली सक्तिने शाळेची फिस वसुली विरोधात शिक्षण मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, व गटशिक्षणाधिकारी देगलूर यांच्या कडे तक्रार करण्यात आले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सर्व पालकांना आवाहन केले आहे की शाळेत फीस भरत असताना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे भरावे व कोणी जादा शुल्क भरण्यास सक्ती करीत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे संपर्क साधावा जेणेकरून आपली मदत करत येईल. सदरील तक्रार दाखल करतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उप जिल्हाअध्यक्ष बालाजी याटावार
तालुका अध्यक्ष आकाश देशमुख,तालुका उपाध्यक्ष राजू अल्लापुरकर,तालुका सचिव काशीनाथ पाटील, शहराध्यक्ष बंटीभाऊ टेकले, शहर उपाध्यक्ष बालाजी मैलागीरी,शहर सचिव अनिल आऊलवार व अनेक मुख्य पदाधिकारी उपस्थित होते