मुख्य रस्त्यावरील दुकान फोडून चोरट्यांचे पोलिसांना आव्हान ?

किनवट प्रतिनीधी सी .एस. कागणे, किनवट : दि 07 : पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरात अवैध धंद्यांना उत्त आलाच आहे आता मुख्य रस्त्यावरील दुकानांचे शटर तोडून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या ही वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वी या चोर्‍या व अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याची मागणी होत आहेत.
किनवट शहर व परिसर सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे शहरात अवैद्य मटका, जुगार, गुटखा व मध्य विक्री राजरोसपणे सुरू असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत त्यातच गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे गल्लीबोळात घरफोड्या होत असून मोठ्या प्रमाणात दुचाक्या मोटर सायकल ही चोरीला जात आहेत तर नागरिकात दहशत पसरली असून पोलिस प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत त्यामुळे प्रकरणी संशय व्यक्त होत आहे शिवाय शहरातील २४ तास वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील दुकाने ही आता सुरक्षित राहीले नाही याचाच प्रत्यय म्हणजे बस स्टँड रोडवरील राजेश्वर किराणा तर दुसरे मुख्य रस्त्यावरील आशीर्वाद सुपरमार्केट व श्रीनिवास मेडिकल या दुकानांमध्ये राजरोस करण्यात आलेली चोरी आहे मोठा ऐवज जरी चोरीला गेला नसला तरी मुख्य रस्त्यावर शटर तोडून दुकानात शिरून चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे प्रकरणी आशीर्वाद सुपर मार्केट चे मालक सुमित चाडावार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनवट मध्ये गुरण ३११/२१ कलम ४५७, ४५४, ३८० नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *