गिरी कन्ट्रक्शन नांदेड च्या भ्रष्टाचाराने व अधिकारी यांच्या हलगर्जीपणाने मौजे हिब्बट ता मुखेड जि नांदेड येथील मंडलापुर पाटा ते कोळगाव फाटा रोडचे दोन महिन्यातच तीन तेरा नऊ अठरा झाल्यचे स्पष्ट दिसून येत आहे.
मुखेड ता. प्रतिनिधी ज्ञानेश्वर कागणे, १२ :
मुखेड (जि.नादेड) मौजे हिब्बट येथील मंडलापुर फाटा ते कोळगाव फाटा हा १३०० मिटरचा रोड दोन महिन्यापूर्वी गिरी कंट्रक्शन नांदेड यांनी केला आहे सदरील रोड हा दोन महिन्यात उखडुन गेला आहे.
मौजे हिब्बट येथील सरपंचांनी कॉन्टॅक्टर व अधिकारी याच्याशी संपर्क केला कसता उडवा उडवची उत्तरे दिली जात आहेत. मौजे हिब्बट व मौजे कोळगाव या दोन्ही गावातील नागरिकांना दळणवळणासाठी हा रोड असुन सध्या या रोडवर कॉन्टॅक्टर व अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराने व हलगर्जीपणाने रोड वर खड्याचे साम्राज्य निर्माण झाले हिब्बट व कोळगाव येथील नागरिक त्रस्त झाली आहेत नागरिकात अशी कुजबूज सुरू आहे की या कामामध्ये कॉन्टॅक्टर व अधिकारी यानी संगणमत करून भ्रष्टाचार केल्याची चर्चा सुरू आहे सदरील कामाची चौकशी करावी व दोशींवर योग्य कार्यवाही करावी हि हिब्बट चे सरपंच व दोन्ही गावातील नागरिकांची मागणी आहे जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे दखल देऊन काय कार्यवाही करणार याकडे दोन्ही गावकऱ्यांचे लक्ष लागुन आहे