देगलूर विधानसभा पोटनिवडणूक ; चोख बंदोबस्तात आज मतमोजणी.

सर्वच उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक

प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज

मतपेटीतून खुलणार उमेदवाराचे भाग्य

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक की या मतदानाचा निकाल आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी लागणार असून त्यासाठी पंचायत समिती सभागृह येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यासाठी प्रशासन व पोलिस बंदोबस्त संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे ही मतगणना 14 टेबलवर असून एकूण तीस फेऱ्या होतील असा निकष आहेत कोरोना ची पार्श्वभूमीवर संपूर्ण दक्षता घेऊन हा निकाल निर्णय घेण्यात येत असल्यामुळे कदाचित निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे

 

या निवडणुकीसाठी २ लाख ९८ हजार ८५३ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ७६१ मतदारांनी मतदान केलं होते. विधानसभा मतदारसंघात ६३.९३ टक्के मतदान झाले होते. या मतमोजणीसाठी ७० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीचा ‘श्री गणेशा’ सकाळी आठ वाजल्यापासून सुरु

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी २ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीसभागृह येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणारआहे. १४ टेबलांवर ३० फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. टपाली मतदानाच्या मोजणीसाठी एक टेबल ठेवण्यात आले आहे. तसेच १० अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस राखीव ठेवण्यात आलेत. टपाली मतदानाद्वारे ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

कोरोना चाचणी बंधनकारक 

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी मतमोजणीच्या पुर्वी ७२ तासात कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह असल्याचा प्रमाणपत्र ठेवतील त्यांनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. तो फक्त मतमोजणी कक्षात जाहीर करण्यात येईल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकालासाठी वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) चा वापर करूनही पाहता येईल.

सीसीटीव्हीद्वारे मतमोजणीवर नजर 

मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

निकालाची उत्सुकता शिगेला

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काय लागेल यावर सर्वच उमेदवारांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशाला या निकालाची उत्सुकता असून यामध्ये पंढरपुरची पुनरावृत्ती होईल का यासाठी सर्वांचे लक्ष या निकालावर लागल्यास आहे या निकालासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी साम-दाम-दंड-भेद पणाला लावून जी मेहनत घेतली त्याचे काय परिणाम होतील हे येत्या काही तासातच कळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *