मुखेड पंचायत समिती मधील महिला बचत गटाचे समन्वयक अधीकारी यांच्या गैरप्रकार प्रकरणी महीला बचत गटाने तक्रार करुनही कार्यवाही नाही

 

मुखेड प्रतीनीधी-ज्ञानेश्वर. कागणे

मुखेड दि.१७ मुखेड पंचायत समिती मधील महिला बचत गटाचे समन्वयक अधीकारी यांच्या गैरप्रकार प्रकरणी मौजे हिब्बट येथील प्रगती महीला ग्राम संघाने व हिब्बट येथील महीला बचत गटाने दि २५/११/२०२१ रोजी तक्रार केली आहे
ग्राम संघ व बचत गट महीलाच्या तक्रारी नुसार पंचायत समितीचे समन्वयक आधीकारी मौजे हिब्बट येथे ते मूखेड येथे रूजु झाल्यापासून आजपर्यंत तक्रार देऊनही आलेले नाहीत
मौजे हिब्बट येथील जवळपास २०ते २५ महिला बचत गटा पैकी जवळपास सर्वच महिला बचत गट बंद पाडण्याचे काम समंधीत अधिकारी यांनी केले व बचत गटाचे काम न पाणार्याचे.रेकॉर्ड न मेंटन करण्यात येनार्या कर्मचारी चे पगार संघाला विश्वासात न घेता न विचार पुस न परवानगी घेता करणे अशी कामे केली आहेत
अशा कामचुकार समन्वयक अधिकार्याची बदली करण्यात यावी म्हणून अर्ज व ठराव पास करुन सुध्दा जिल्हापरिषद व पंचायत समीती व तहसील कार्यालयानी कोणतीही कार्यवाही केलेली नाही अशा कामचुकार आधीकारी व कर्मचारी वर कार्यवाही होनार का नाही की वरीष्ठ आधिकारी पाठीशी घालनार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *