‘समता वारी’ अहवाल शहिदास अर्पित

 

नायगाव प्रतिनिधी, दि.०६ मार्च :-

महाराष्ट्रात संत चोखामेळा अध्यासन केंद्र माध्यमातून गत ३ वर्षांपासून चालविण्यात येणारी चोखोबा ते तुकोबा ही ‘समता वारी’ ही १ जानेवारी ते १२ जानेवारी असा तब्बल १२ दिवसांत सोलापूर,उस्मानाबाद,बीड,औरंगाबाद,अहमदनगर, नाशिक,पुणे या ७ जिल्ह्यातून १३२०किलोमीटर प्रवास करत मंगळवेढा ते देहू अशी ‘समता वारी’ आयोजित केली जाते. या वारीचा सविस्तर प्रवास/कार्यक्रम अहवाल प्रति वर्षी तयार केला जातो.

या वर्षी ‘समता वारी’ निमंत्रक सचिन पाटील व सहकारी यांनी असे ठरविले की,राज्यातील समतेचे प्रतीक असलेल्या विविध केंद्रांवर भेट देत क्रांतिकारी स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी विविध जिल्ह्यातील स्मृतिस्थळी भेट देऊन तेथील पराक्रमाला नतमस्तक/अभिवादन करत हा “समता वारी’ अहवाल अर्पित करण्यासाठी प्रवास सुरू केला आहे.

यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टेम्भुर्णी गावातील शहिद पोचिराम कांबळे यांच्या स्मृतीस्थळी भेट देत ‘समता वारी’ अहवाल क्रांतिकारास अर्पित केला. शहिद पोचिराम कांबळे हे विद्यापीठ नामांतर लढ्यावेळी शहीद झाले होते,त्यांचे बलिदान या राज्यासाठी,देशासाठी बहुमोलाचे असल्याने ‘संत चोखामेळा अध्यासन केंद्र’ निमंत्रक सचिन पाटील व विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.सुनिल गायकवाड यांनी हा शहीद इतिहास कायम लोकांच्या स्मरणात रहावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरविले

तसेच मा.खा.सुनिल गायकवाड यांनी या स्मृतीस्थळ परिसरात एक सभागृह उभारणीसाठी निधीची तरतूद करून देत भव्य सभागृह उभारणीदेखील करण्यात आली आहे,याच सभागृहात दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमास सत्यशोधक संस्थेचे नरसिंगे सर,प्रा.श्रीकांत गायकवाड,मा.गटशिक्षणाधिकारी वाघमारे,बेलके,ऋषिकेश सकनूर,युवा पत्रकार गजानन जोशी,शिवसांब देशमुख,मन्मथ कस्तुरे,भास्करे व नागरिक उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *