जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि १२ : जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या जिल्हा युवा पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई  उपनगरचे प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

२०२१-२२ या वर्षाकरिता प्रत्येकी एक युवक, एक युवती, आणि एक संस्था असे एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग dsomumbaisub.blogspot.com येथे उपलब्ध आहे.

युवक किंवा युवती पुरस्कारासाठी पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्षे पूर्ण असावे तसेच ३१ मार्च रोजी ३५ वर्षाच्या आत असावे. अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्यास असला पाहिजे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रके, चित्रफीती, फोटो इत्यादी सादर करावेत. केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. संस्थेसाठी असलेल्या युवा पुरस्कारासाठी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पाच वर्ष कार्यरत पाहिजे. संस्था सार्वजनिक विश्र्वस्त अधिनियमानुसार पंजीबद्ध असावी. गुणांकनाकरिता संस्थेन केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इत्यादी जोडावेत.

पुरस्कारासाठीचा अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परीसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४०० १०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२८८७११०५ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *