मुखेड प्रतिनिधी .ज्ञानेश्वर कागणे,दि.१६ :- मुखेड.संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुखेड तालुक्यातील मौजे हिब्बट (लघु आळंदी) येथील मंदिरात हनुमंतरायाच्या जन्मोत्सवा निमित्ताने भव्य भागवत कथा ,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायन सोहळ्याची सुरवात चैत्र शुध्द नवमी दि १० रविवार पासुन गावातील मानकरी मुकदम पाटील परीवाराकडुन राम नवमी साजरी करुन झाली आहे.मारोतीरायाचा जन्मोत्सव सोहळा दि १६ एप्रिल शनिवारी गावातील पुरोहित ब्राह्मण देव यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५:३० वाजता झाली तर सकाळी ६:०० ते ९:३० या वेळेत ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली व नंतर १०:०० ते१२:३० संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे गाता पुजन झाले सप्ताहाचा समारोप दि १७ एप्रिल रविवारी हभप गुरुराज महाराज देगलूरकर यांच्या किर्तनाने व काल्याच्या महाप्रसादाने होनार आहे उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक -भक्तानी उपस्थित राहुन हनुमंतरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अव्हान गावकऱ्यांनी महीमा खादीचा या व्रत पत्राच्या माध्यमातून केले आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे हिब्बट (लघु आळंदी)येथील मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.प्रतीवर्षी हिब्बट (लघु आळंदी) येथे जन्मोत्सव निमित्ताने हजारो भाविक भक्त येऊन आपली मनोकामना पुर्ण करतात ज्याची इच्छा पुर्ण झाली ते भाविक गावजेवन भंडारे हनुमंतरायाला करतात कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भक्तांना हनुमंतरायाचे दर्शन घेता आले नाही. यंदा कोरोनाचे निर्बंध हटवीण्यात आल्याने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हिब्बट (लघु आळंदी) येथील मारोतीरायाचा मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन ग्राम वासीयखकडुन करण्यात आले होते.
तर अन्नदानाची व्यवस्था गावातील भक्तांकडुन करण्यात आले तर हनुमान जयंती निमित्त गावकऱ्यां तर्फे करण्यात आले होते
रामनवमी दि १० पासुन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी ६:०० ते ११:०० या वेळेत व्यासपीठ प्रमुख संजय कागणे यांनी केले तर ११:००ते १२:३० गाथा भजनव दुपारी १२:३०ते५:०० आळंदी येथील भागवताचार्य हभप संतोस महाराज टिकार यांच्या मधुर वानीतुन झाले तर रात्री ८ ते १० या वेळेत हभप बालाजी महाराज कत्तलवाडीकर ,हभप बाळू महाराज जांभळवाडीकर,हभप माधव महाराज पोलीस वाडीकर,हभप दत्ता महाराज प्रचंडा,हभप संतोस महाराज आळंदीकर,हभप कालीदास महाराज पाळेकर,औरंगाबादचे जिल्हाधिकारी हभप विजयकुमार फड महाराज यांचे किर्तन झाले.
दि १७ रविवारी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोप दिनी सकाळी ६ते९ गावातील प्रमुख रस्त्यावरुन पालखी मिरवणूक होईल व हभप गुरूराज महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ते१२:००या वेळेत होनार असुन त्यानंतर भव्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि गावकऱ्यांची विनंती आहे.