देगलूर प्रतिनिधी, दि. ११ :- देगलूर तालुक्यातील नागराळ ग्रामपंचायत मधील मौजे पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याचे जनावराच्या गोठ्यात आग लागून पशुखाद्य व शेतीच्या अवजारांचे नुकसान.
सविस्तर वृत्त असे आहे की देगलूर शहराजवळ हैदराबाद रोड कडे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी किशन विठ्ठल भोसले हे पशु पालन करुन आपला उदरनिर्वाह करतात. सुमारे चार दिवसापूर्वी दिनांक ०७/०६/२२ रोजी संध्याकाळी ४:३० च्या सुमारास अज्ञात कारणाने त्यांच्या जनावराच्या गोठ्यात आग लागून जनावरांचे खाद्य (कडबा), व शेतीसाठी लागणारी अवजारे, ताडपत्री असे शेतीचे शेती उपयुक्त सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात पशूंची किंवा माणसांची जीवित हानी झाली नाही ही आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण आग आटोक्यात आली नाही, आणि अचानक पेट घेतलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान झाले आधीच कोरोनाच्या महामारी नंतर आर्थिक फटका बसल्याने कसेबसे सावरत असताना त्यात या आगीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी किसन भोसले हा आर्थिक दृष्ट्या गळून पडला आहे. या आगीमध्ये जनावरांचा चारा जळून गेल्यामुळे जनावरावर उपासमारीची वेळ येईल की काय ही चिंता सध्या या पशुपालकास लागली आहे.
या आगीचा पंचनामा मारकवाड तलाठी मॅडम यांनी केला असून के कार्य प्रणालीचा वापर करून या अल्पभूधारकास तात्काळ शासनाची मदत मिळावी असे गावकर्यांचे म्हणणे आहे.