प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

महिला व बालविकास अधिकारी यांचे अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. १४  : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा यादृष्टीने त्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी दि. ४  मार्च २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड निर्बंधांमुळे यात खंड पडला होता. परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.

महिला लोकशाही दिनासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, १  ला टप्पा, २ रा मजला. आर. सी. मार्ग चेंबुर – ७१  येथे उपलब्ध आहेत. विहित नमुन्यातील अर्ज हा महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२२ -२५२३२३०८  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महिला व बालविकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *