२७ जूनला देगलुर नगरपरिषद प्रशासना विरोधात आमरण उपोषणाची तयारी

 

 

देगलूर (प्रतिनिधी) दि. १९:- देगलूर नगरपरिषदे अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मध्ये गौतम नगर (खाजाबाबा नगर) येथे वर्ष २०२१-२०२२ मध्ये लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नागरी दलित वस्ती या योजने अंतर्गत सी. सी. रोड व दोन्ही बाजूंने बंदीस्त नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सज्जड पुरावे आमच्या कडे आहेत असे उपोषणकर्ते हबीब रहेमान व इर्शाद पटेल यांनी सांगितले आहे.


कामाची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासून प्रत्येक कामाची दररोज फोटोग्राफी वेळोवेळी केलेली आहे. शिवाय गौतम नगर येथे झालेला काम अंदाज पत्रानुसार न होता हे अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन असून या कामाची चौकशी ( National Acceditation Board for Testing and Calibration Laboratories) यांच्याकडून कामाची तपासणी करण्यात यावी. व दर्जाहीन कामे करून करोडो रुपये गिळंकृत करणाऱ्या ठेकेदार व त्यास मदत करणारे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी ज्यामध्ये मुख्याधिकारी, अभियंता, सल्लागार अभियंता, लेखाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांच्याकडून कामासाठी देण्यात आलेली रक्कम व खर्च परत घेऊन शासन दरबारी जमा करावी असेही त्यांनी व्यक्त केले.. तसेच संबंधित ठेकेदाराला काळया यादी टाकून त्यावरती आय. पी. सी. धारा ४२० नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच कामाची चौकशी करूनच देयकांना मंजुरी द्यावी यासाठी दिनांक १०/१२/२०२१ रोजी निवेदन दिलेले असताना सुद्धा बिलांना मंजुरी देणारे मुजोर प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले नाही तर आम्ही दि. २७/०६/२०२२ रोजी देगलूर नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसणार आहोत. दरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही नगर परिषद प्रशासनाची राहणार असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *