राजकुमार ढाकणे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरनातून हकलपट्टी

मुंबई, दि. २९ : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य पदावर राजकुमार भुजंगराव ढाकणे यांची नियुक्ती नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या वर्गात करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालकांनी सादर केला.

सदरील अहवालाचा विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २२ प तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्ट (१९०४ चा १) च्या कलम १९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासनाने त्यांना या पदावरुन काढून टाकले आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने निर्गमित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *