औरंगाबाद , दि.३० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.
शुक्रवार दि.२९ जुलै रोजी सोयीनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार दि.३० जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
रविवार दि.३१ जुलै रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन आदी कार्यक्रम होतील. त्यानंतर मुख्यमंत्री सोयीनुसार मुंबईकडे रवाना होतील.