नांदेड दि. २३ :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागतनगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना नुतन प्रवेशासाठी ३० ऑगस्ट २०२२ पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक, सन २०२१-२२ या वर्षाचे तहसिलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत २२ ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील.
विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही, असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.