देगलूर प्रतिनिधी: देगलूर येथील तरुण व होतकरू पत्रकार अजीम अन्सारी यांचे वडील अन्सारी अब्दुल गणी अब्दुल हमीद (वय ८० वर्षे) यांचे ६ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने अल्पश आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सून,जावई, नातू, नातवंडे आणि मोठा परिवार आहे.
स्वर्गीय अब्दुल गणी यांच्यावर उदगीर येथील मकबरा नावांबान परिसरातील कब्रिस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात दफनविधी व अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. त्यांच्या जाण्याने अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पत्रकार वर्तुळातून आणि विविध सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
अन्सारी कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी देगलूरसह परिसरातील पत्रकार बांधव आणि नागरिकांनी सहवेदना व्यक्त करून दिवंगत आत्म्यास शांती लाभो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे
