वाहनांसाठीचे इंधन म्हणून गॅसोलीनमध्ये १२ % आणि १५ %इथेनॉल मिश्रणाचा वापर केला सुल
नवी दिल्ली, २२ जुलै २०२१
ऑटोमोटीव्ह अर्थात वाहनांसाठीचे इंधन म्हणून गॅसोलीनमध्ये १२ % आणि १५ %इथेनॉल मिश्रणाचा वापर सुलभ करणारा जी एस आर ४३९(ई), २८-०६-२०२१,अधिसूचित केला असून संबंधीतांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण साध्य करण्याची नियोजित तारीख आता पाच वर्षे आधी म्हणजे 2025 हे वर्ष करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. इथेनॉल मिश्रण करणारा भारत २०२०-२५ यासाठी नीती आयोगाने पथदर्शी आराखडा तयार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा आणि पर्यायी इंधन वापरणाऱ्या वाहनांना सरकार प्रोत्साहन देत असल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.