अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत २ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत
मुंबई, दि. ०२ : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक ३ जुलै आणि सोमवार, दिनांक ४ जुलै, २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक ०२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक ०३ जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.