Warning: Array to string conversion in /home/u350072333/domains/mahimakhadicha.com/public_html/wp-includes/formatting.php on line 1096

३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. ०१ सप्टेंबर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा.

 

 

 

तदनंतरच तक्रार अर्ज स्वि कारण्यात येईल, तसेच निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी १२ ते १ वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *