‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची २४, २५, २६ ऑक्टोबरला मुलाखत

मुंबई, दि.२२  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार, दि. २४, मंगळवार दि.२५ व बुधवार, दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

 

साहित्य रसिकांना, साहित्याच्या विविध प्रकारांबद्दल, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, त्याचप्रमाणे बालगोपाळांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी बालदिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमातून दिवाळीच्या उत्साही वातावरणात ऐकायला मिळणार आहे. ज्येष्ट निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *