धनाजी मनोहरराव जोशी यांना राष्ट्रीय आदर्श कार्यगौरव युवारत्न नागरी पुरस्कार.

 

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.०२:- अहिल्याबाई होळकर यांचे वंशज राजे भुषणसिंहजी महाराज यांच्या हस्ते जयसिंगपूर जि कोल्हापूर येथे देगलूरचे शिवसेना शहर सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांना २०२२ चा राष्ट्रीय आदर्श कार्यगौरव युवारत्न पुरस्कार प्रदान.

 

 

देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी मनोहरराव जोशी हे राजकारणात असुन सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या विचारावर ते काम करत असतात त्यांना समाजकार्यत खूप आवड असते ते वेळोवेळी सतत गोरगरिबांसाठी काय करावे काय नाही सतत त्यांच्या डोकात चालू असते ते अनेक प्रसंगामध्ये जावु लोकांना जी मदत त्यांच्या पध्दतीने करता येईल ती करत असतात.

 

कोरोना काळात तर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव तर अनेक सामाजिक संघटना वेगवेगळे NGO नी घेतला त्यांना कोविड काळात तर त्यांना कामाच्या जोरावर त्यांना अनेक संस्थानी त्यांना कोविड योध्दा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले त्यांचा कामाचा डंका नेहमी गाजतच असतो धनाजी जोशी यांनी स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी निमित्ताने गोरगरीब जनतेचा दोन लाखाचा मोफत विमा काढून दिला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात १०० झाडे वृक्षारोपण केले लोकांचे मोफत मध्ये ई श्रम कार्ड काढून दिले दहावीच्या व बारावीच्या विध्यार्थ्यांना मोफत रिझल्ट काढून दिले.

 

 

तसेच महापुरुषांच्या जयंती निमित्त व मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व तसेच पोलीस भरती च्या काळात आठवडा भर मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरे आयोजित केले त्यांच्या हा कार्याची दखल घेऊन नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री

 

 

अनेकांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री व्यंकटरावजी जाधव साहेब यांनी धनाजी मनोहरराव जोशी यांनां राष्ट्रीय आदर्श कार्यगौरव युवारत्न नागरी पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळ गावी जयसिंगपूर जि कोल्हापूर येथे अहिल्याबाई होळकर यांचे वंशज राजे भुषणसिंहजी महाराज यांच्या हस्ते देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना प्रदान करण्यात आले.

 

 

तरी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने साहेब मा खासदार राजुजी शेट्टी साहेब बिग्रेडियर सुधिरजी सांवत साहेब आमदार डॉ राजेंद्र पाटील साहेब व यांच्या समवेत अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.

 

माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटरावजी जाधव साहेब व यांच्या समवेत असलेल्या मंडळीचे व महात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेच्या सर्व मान्यवरांचे धनाजी मनोहरराव जोशी यांनी आभार मानले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी मनोहरराव जोशी यांनी ह्या पुरस्काराने त्यांना आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असे राष्ट्रीय आदर्श कार्यगौरव युवारत्न नागरी पुरस्कार प्राप्त धनाजी मनोहरराव जोशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *