देगलूर प्रतिनिधी दि.०७:- दि.०२-०१-२०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लातुर येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १९ वर्ष मुले या वयोगटातील खेळाडू जरासंध दुर्योधन बोडके १२ कला शाखेत शिकत आहे त्याने ७९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.पुढे त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या खेळाडूने आपले वर्चस्व कायम ठेवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून क्रीडा संचालक डॉ.निरजकुमार उपलंचवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिपक वावधाने क्रीडा शिक्षक सिताराम हाके. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यांच्या या घवघवित यशाबद्दल खेळाडूंचे अभिनदंन अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री गंगाधर जोशी, श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा द्याडे.
श्री देवेंद्र मोतेवार श्री चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य श्री चमकुडे एम. एम. ,प्रसिद्धि प्रमुख डॉ. बी. आर .कत्तुरवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.