तेलंगण प्रतिनिधी दि.०८ :- : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाला भेट देणार आहेत. या महिन्याच्या १९ किंवा २० तारखेला ते राज्यात येणार असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनसह बीबी नगर एम्सचे उद्घाटन ते करणार असल्याचे दिसते.
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे कामही सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी मोदींना यापूर्वीच वंदे भारत एक्सप्रेसच्या लॉन्चिंगला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.