देगलूर प्रतिनिधी दि.३० :- यशवंत माध्यमिक विद्यालय गवंडगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व मा. कै. किशनराव यशवंतराव वरखिंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके
( वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय) व प्रा. शंकर पाटील, (वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय).डॉ. सुनील जाधव प्रमुख मार्गदर्शक होते. डॉ. दिलीप भडके( वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर) यांनी जीवनात खेळाचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. शंकर पाटील,(वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर)
यांनी आपल्या मिमिक्रीच्या कलेतून हास्यकल्लोळ निर्माण केले. डॉ. सुनील जाधव यांनी अनेक शिव वंदना गीत गायन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. शिवाजीराव वरखिडे पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनाविषयी महत्व मांडले. अध्यक्षस्थानी श्री मरतुळे पाटील होते. मुख्याध्यापक
देगलवाडे सर प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पाटील सर, प्रमुख पाहुण्यांचे परिचय कानोटे सर यांनी करून दिले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले .या कार्यक्रमास आकाश पाटील, खानापुरे पाटील, व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद होता.