देगलूर प्रतिनिधी दि.२० :- देगलूर तालुक्यात महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते गावा गावात मध्ये जाऊन प्रचारावर जोर धरत आहेत.
सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र जोमात सुरु असुन,त्यात महाविकास आघाडी चे नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हान यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते देखील मागे नाहीत. असे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज बागन टाकळी या गावामधे जाऊन काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काही कार्यकर्ते घरोघरी भेटी देउन् वसंतराव यांना मतदान करण्याचे आव्हाने केले आहे.
