हैदराबाद प्रतिनिधी, दि.२४:- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार संचालित एमएसएमई टूल रूम, सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाईन (सीआयटीडी), हैदराबाद ने विविध पदविका अभ्यासक्रमांसाठी एसएससी उत्तीर्ण उमेदवारांचे आमंत्रित केले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना
प्रवेश हैदराबाद मध्ये २६ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेतील उत्तीर्णतेच्या आधारावर दिला जाईल.
संस्थेचे उपसंचालक सुग्यान राजन दलाई यांनी आज येथे संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार सीआयटीडी द्वारे टूल डिझायनिंग आणि मोल्ड मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, रोबोटिक्स इंजिनिअरिंग आणि
प्रोडक्शन इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमांचे संचालन करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय १९ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा २६ मे २०२४ रोजी हैदराबाद येथे आयोजित करण्यात येईल. दिनांक २० मे २०२४ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी फोन नं. ९५०२४०५१७० किंवा संस्थेच्या https://www.citdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.