बागणं टाकळी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी

देगलूर प्रतिनिधी,दि.३०:- देगलूर शहरालगत असलेल्या बागन टाकळी गावामध्ये नवतरून मुलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमास देगलूर येथील डॉ उत्तम कुमार इंगोले सर व संजय कांबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले. व नव्यांने शासकीय सेवेत रुजू झालेले संभाजी वाघमारे यांनी गावातील मुलांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती सांगितली शिकून आपण आपल्या समजात चांगले काम केले पाहजे, व समाजासाठी आपण वेळ दिला पाहिजे अशा प्रकारे मार्गदर्शन केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुक अध्यक्ष संजय कांबळे व डॉ उत्तम कुमार इंगोले सर यांनी ही

 

 

 

 

 

 

 

 

मार्गदर्शन केले. कार्यक्रमांस गावातील उपसरपंच मौला पटेल व गावातील पोलीस पाटील अफसर पटेल व माजी सरपंच शंकर वाघमारे व गावातील कार्यकर्ते अक्षय भालेराव,रतन सोनकांबळे
रुपेश भालेराव,अजय सोनकांबले ,उत्तम सोनकांबळे ,कपिल सोनकांबळे भीम जयंतीचे अध्यक्ष जयपाल सोनकाबळे व विजय सोनकांबळे व गावातील भीम सैनिक व गावातील नागरिक व महिला मंडळ उपस्तिथ होते.