ठाणे, दि.११ :- येत्या 20 मे २०२४ रोजी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, मतदान करुन आपली लोकशाही बळकट करा असा संदेश देत विदयार्थ्यांनी नागरिकांना देत मतदानाबाबत जनजागृती केली.
२४ – कल्याण लोकसभा मतदारसंघातील, १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक)
महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली गणेश विदया मंदिरातील विदयार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ड प्रभागक्षेत्र कार्यालय, विजयनगर, ओपन जिम, डी मार्ट रेडी, विजयनगर पोलीस चौकी, गौरी विनायक बिल्डर कार्यालयासमोर, विजयनगर नाका चौक, ओम नमो साई श्रद्वा अपार्टमेंट जवळ,पोटे अपार्टमेंट ,शशिकला एनक्लेव, स्वामी समर्थ मठाजवळ, दादासाहेब मतदारांना मतदनाचे महत्व विषद केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाविषयक पत्रके वितरित करीत येत्या २० मे रोजी मतदान करणेबाबत आवाहनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीपर घोषणा देऊन नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संदेश दिले.
यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.