राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. ०१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२१ ते ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.३१ जानेवारी २०२२ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in  आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *