कोटा परंदोली भीडवार या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला
किनवट प्रतीनीधी सि.एस.कागणे , दि.०१/०२/२०२२
आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड, चित्रपटचा उदघाटन सोहळा तेलंगाना राज्यातील कोटा परंदोली भीडवार गोंदी कुमराम भीम जिल्हा आसिफाबाद या ठिकाणी मोठया उत्साही वातावरणात पार पडला तसेच या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यातून ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे होते .तर चित्रपटाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी कनाके यांच्या हास्ते करण्यात आले. ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे स्वीय सहायक रमेश परचाके सर्व संगाजनाच्या च्या उपस्थितीत हा नयनरम्य उदघाटन सोहळा उत्साही वातावरणात पाडला.
चार हजार वर्षापूर्वीचा माता जंगोरायताड चा इतिहास प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमराम भीम आर्ट्स या फाउंडेशन तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट सलग तीन तासाचा असणार आहे चित्रपटाच नाव आगीनधुड जंगोरायताड आहे.
या चित्रपटाचा निर्माता व्यंकटेश कुमरे ,संगीतकार वेठ्ठी योदन, गायक केशव नैताम,जंगो कनाके ,कुमराम भीम आर्ट्स युनीट ची संपुर्ण टीम रमेश घोडाम, वेठ्ठी देवीदास, लक्ष्मण घोडाम ,कॅमेरामॅन राकेश, या सर्वाच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला जाणार आहे हा चित्रपट निर्माण करण्यासाठी विशेष निधी समाज बांधवान तर्फे मिळाला त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत, रामकृष्ण मेश्राम मुंबई, रमेश कोवे ,राजु सिडाम, गणेशजी डोंगरे, मारोती कन्नाके, कैलास पंधरे, मोहन कोवे, प्रतिक केराम,मुरहारी कन्नाके, सुभाष कन्नाके
या सर्वाच योगदान मोलाच आहे.या ही पुढे समाजातील लोकांच योगदान मिळेल अशी आशा सुभाषजी कनाके यांनी आमच्या चॅनल ला बोलावून दाखवली . या वेळी साईकिरण वेठ्ठी,गजानन आरके, गणेश वेठ्ठी, संतोष पहुरकर, जितेंद्र कुलसंगे, संतोष कन्नाके, गणेश आरके, शंशाक कन्नाके सौरभ कन्नाके आदींची उपस्थिती होती.