मुंबई प्रतिनिधी, दि. ०९ : राज्याचे सुधारित महिला धोरण ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने जाहीर करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्याची इंग्रजी भाषेतील प्रत महिला व बालविकास आयुक्तालयाच्या www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून या मसुद्याची मराठी भाषेतील प्रत देखील दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी याच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, राज्याच्या सुधारित महिला धोरणाच्या या प्रारुप मसुद्यांबाबतचे आपले अभिप्राय महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या mahilavikas2021@gmail.com या ईमेलवर दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत, असे महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.