ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शंभर यात्रेकरूंच्या दुसऱ्या जथ्याचे नांदेडमध्ये भव्य स्वागत

 

नांदेड प्रतिनिधी, दि.२८ :- विसाव्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेला शंभर यात्रेकरूंचा दुसरा जत्था बुधवारी दुपारी नांदेडला सुखरूप पोहोचल्यांनंतर नांदेड रेल्वे स्थानकावर अमरनाथ यात्री संघातर्फे सतिष सुगनचंदजी शर्मा व इतरांनी जल्लोषात स्वागत केले.

 

तेरा दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, जम्मू श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, अमृतसर,अटारी वाघा बार्डर या स्थळांना सर्वांनी भेटी दिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील नांदेड येथे दिलीप ठाकूर यांनी चार महिने यात्रेकरूंचा पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव घेतल्यामुळे सर्वांची प्रकृती उत्तम राहिली.
योग्य नियोजन,जेवणाची, राहण्याची व प्रवासाची उत्तम व्यवस्था, भरपूर मनोरंजन यामुळे विसावी अमरनाथ यात्रा संस्मरणीय झाली.

यात्रा यशस्वी करण्यासाठी संदीप मैंद, विशाल मुळे, संजय राठोड, मंगेश घोलप व लक्ष्मीकांत यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेमध्ये
केशवराव हळदेकर, डॉ. शिवाजी भोसले,डॉ. दीपकसिंह हजारी,
अशोक सराफ कानडखेडकर, प्रकाश पत्तेवार, प्रा.लक्ष्मण पटणे धर्माबाद,उमाकांत उदगीरकर परळी, पांडुरंग ब्याळे परभणी,एन.डी. पवार,प्रा.जगन्नाथ सावळे, राजेश्वर सावंत,अशोक पवार,जीवन वडजे,बालाजी दावलबाजे,सुभाष शिंदे,ॠषीश्वर गोस्वामी, गोविंद वट्टमवार,किशनजू यादव, नरेंद्र देशमुख,रघुनाथ गज्जेवार,जालिंदर जमदाडे,तुळजादास बोराळकर परभणी, किशोर लाटकर पुणे,
बाळासाहेब पानसे,नारायण गुट्टे किशनसिंह ठाकूर हैदराबाद ,
बाबूराव देशमुख बिलोली,केदारनाथ हुरदळे पुणे ,सुरेंद्र पाडळकर मुंबई,राजेंद्र खैरनार धुळे,महेंद्र चव्हाण हैदराबाद, लक्ष्मण विभूते लातूर,विश्वंभर कुरे धर्माबाद, शिवप्रसाद कोरे लातूर,प्रदीप मिटकरे ढानकी,भरतराज देशमुख रायचूर कर्नाटक,ॲड. गंगाधर कोदळे लातूर, डॉ. संजीवकुमार रायचूरकर यादगिर कर्नाटक हे सपत्नीक सहभागी झाले होते.रोहित पाटील,सटवाजीराव नांदेडकर, शिवाजी वारकड, शिवानंद माळगे, अशोक शिवणगावकर ,मधुसूदन राठी, पत्रकार साईनाथ कोटगिरे बाराळी,भैरवसिंग रायचूरकर यादगिर कर्नाटक, डाॅ.बिद्री धनंजय पटेल हैद्राबाद,विनय हजारी कर्नाटक यांनी देखील यात्रेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. डॉ.अर्चना हजारी ,शैला टोकेकर संभाजीनगर,मनीषा पंडित नाशिक,सुलोचना माळगे बार्शी, भारतीबाई थोटे ,सुप्रिया हलकुडे धर्माबाद,लक्ष्मी टेंकाळे,सुरेखा गादेवार धर्माबाद , शोभा नंदलवार, नीलिमा देशमुख ,ज्योती ठाकुर, संतोषी हजारी नवलनगर कर्नाटका या महिलांनी देखील खडतर अशी यात्रा खडतर अशी यात्रा पूर्ण केली. सलग विस वर्ष शेकडो भाविकांची अमरनाथ यात्रा सुखरूप घडवून आणल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *