दिव्यांगाना मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड प्रतिनिधी, दि. २८ :-दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी गरजू दिव्यांगानी ३१ जुलै २०२२ पर्यत प्रवेश अर्ज करावेत असे आवाहन मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.

 

प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता ८ वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमसिंबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इयत्ता ९ वी पास. वय १६ ते ४० वर्षे, प्रशिक्षण कालावधी १ वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

सोई व सवलती- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवण्याची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल व व्यावसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

 

अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत – प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळया जवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-४१६४१० दु.क्र.०२३३-२२२२९०८ मोबाईल क्र. -९९२२५७७५६१/९९७५३७५५५७ या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत.

प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबत चे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेराक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे ३१ जुलै पुर्वी पोहोचतील या बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर  तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येईल. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *