जनसेवक आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नामुळे हृदयरोग आजाराच्या रुग्णाला मिळाला १ लक्ष रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी.

 

आ.कल्याणकर ठरत आहेत रुग्णांकरिता संजीवनी…

 

नांदेड प्रतिनिधी,दि०४:- नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या आणि गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या रुग्णांनाही आता दिलासा देण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टी    कोनातील शेवटच्या घटकातील नागरिकही सुखी आणि समृद्ध राहिला पाहिजे या अनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना तात्काळ अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आदेशित केले होते या अनुषंगाने नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवाजीनगर भागातील बजरंग कॉलनी येथील अर्चना प्रल्हाद पाटेवार यांना मेंदूचा आजार झाला होता. उपचारासाठी त्यांना नांदेडच्या यशोसाई या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

मात्र उपचारासाठी पटेवार यांच्याकडे आर्थिक बळ नसल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून मला मदत करावी अशी विनंती त्यांनी आ.बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली होती. आ कल्याणकर यांनी विनाविलंब मुख्यमंत्र्यांकडे निधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे अर्चना पाटेवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले होते. आ कल्याणकर यांचे पाटेवार परिवारांनी आभार मानले.

 

 

या घटनेला काही काळ उलटतोन उलटतो तोच तरोडा भागातील स्नेहांकित कॉलनी येथील शरदचंद्र दुमाने यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील राम मंगल हार्ट फाउंडेशन प्रा.लि. पुणे या खाजगी रुग्णालयास मुख्यमंत्री सहायता निधी मधून १ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे आ.कल्याणकर यांच्या मुळे अनेकांना वैद्यकीय निधी प्राप्त होत आहेत यातूनच आमदार कल्याणकर यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे अन् दुसरीकडे रुग्णांना जीवदान मिळाल्याने मतदारांतून प्रेम व आर्शिवाद मिळत आहेत.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीकोनातील शेवटच्या घटकातील नागरिकही सुखी आणि समृद्ध राहिला पाहिजे या अनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना तात्काळ अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आदेशीत केले आहे. शरदचंद्र दुमाने यांना मिळालेल्या निधीचे पत्र दुमाने यांचे चिरंजीव यांच्याकडे कल्याणकर यांनी दिले. यावेळी दुमाने कुटुंबीयांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.

           Contact 9030512905,or email :-                            newsrajya24@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *