जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम

जळगाव दि :- २८ – शैक्षणिक तसेच त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी २७ आणि २८ सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी सकाळी १० ते ६ पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर जळगाव या ठिकाणी ज्यांना ऑनलाईन, ई – मेलव्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

 

 

 

          तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती पुर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. या कालावधीमध्ये त्रुट/पुर्तता आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वता जबाबदार राहील, याची नोंद घेण्यात यावी असे  आवाहन सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *