देगलूर प्रतिनिधी, दि.१६:- बालाजी नमकीन नायगाव, नरसी, बिलोली, देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी, खानापूर, आटकळी, गडगा, कहाळा. येथील सर्व कन्फिन्सरी बेकरी व्यापारी मंडळी यांनी बैठक घेऊन बालाजी नमकीन यांच्या मालाची खरेदी बंद करण्याचे ठरवले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, देगलूर, नायगाव, धर्माबाद, व बिलोली येथील सर्व बेकरी व कन्फेंशरी व्यापाऱ्यांनी नरसी येथील रेस्ट हाऊस या ठिकाणी दि.१६-११-२०२२ रोजी बालाजी नमकीन या प्रसिद्ध कंपनीच्या आडमुठे धोरणाला कंटाळून एक बैठक घेतली या बैठकीत सर्वांच्या उपस्थितीत असा ठराव पास करण्यात आला आहे.
की आपल्याकडील असलेला बालाजी नमकीनचा स्टॉक आठ दिवसाच्या आत मध्ये विक्री करून त्यानंतर दुसऱ्यांदा मालाची ऑर्डर कंपनीकडे द्यायचे नाही.
दिनांक १६-११-२०२२ रोजी झालेल्या बैठकीच्या ठरावाप्रमाणे जर बालाजी नमकीनची ऑर्डर तथा मागणी केल्यास त्या व्यापाऱ्याला ५१ हजार रुपयांचा दंड लागेल असे सर्वांच्या समक्ष ठरलेले आहे.
व्यापाऱ्यांची एवढी कठोर भूमिका घेण्यामागचे कारण विचारले असता देगलूर येथील व्यंकटेश बेकरीचे मालक सतीश दमकोंडवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की बालाजी नमकीन एजन्सी मालकास चार टक्के सबसिडी देण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे पण त्यांनी ने साफ शब्दात त्याला नकार दिला म्हणून ही टोकाची भूमिका घेतल्याचे सांगितले.
त्यांनी या मालामध्ये आम्हाला खूप काठावरचे मार्जिन आहे त्यामुळे हा माल विक्री करण्यास परवडत नाही एखाद्या चिप्स किंवा नमकीन च्या पट्टी ला जर उंदरांनी फाडले, त्याची हवा गेली तर मुद्दल मध्ये सुद्धा आम्हाला तोटा होतो असे त्यांचे म्हणणे आहे.
सदर कंपनीकडून किंवा कंपनीच्या एजंट कडून कधीही आपणास या आपल्या ग्रुप मधील संघटनेतील कोणत्याही सदस्यास एकमेकाबद्दल गैरसमज करून देणे, किंवा इतर कुठल्याही संभ्रमाला आपण बळी पडलो न पडता आपल्या मतावर ठाम राहावे याची गांभीर्याने सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.