गजानन महाराज, व दत्तात्रयाच्या जयघोषाने शहर दुमदुमले
देगलूर प्रतिनिधी, दि.३०:- देगलूर शहरातील बापू मार्केट जुना पंप हाऊस रोड येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन शेगाव निवासी श्री गजानन महाराज व सर्व प्रसिद्ध श्री दत्तात्रय महाराज यांची भव्य दिव्य मंदिराची संकल्पना केली.
व त्या दिशेने कार्यास गती देत श्री रमेशजी कंतेवार यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज सेवाभावी संस्था तसेच बापू मार्केटचे सर्व सभासद यांच्या सहकार्याने मंदिराचे काम जलद गतीने पूर्वत्वास घेऊन मार्गशीष महिन्यातील शुक्ल पंचमी शके १९४४ म्हणजेच दिनांक २८-११-२०२२ रोजी या सोहळ्याची सुरुवात केली, या रोजी पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, मुख्य देवता पूजन, अग्नी स्थापना, व जलाधिवास तसेच श्रीजीच्या ग्राम प्रदक्षणा असे कार्यक्रम करण्यात.
आले दिनांक २९-११-२०२२ रोजी स्थापित देवता पूजन, मुख्य देवता हवन, न्यास होम, जलाधीवास, हवन पर्याय होम, मूर्ती स्नपन, व शयनदिवास, असे विधिवत पूजन व हवन करण्यात आले.
तर दिनांक ३०-११-२०२२ रोजी म्हणजेच आज सकाळी ७:०० वाजता स्थापित देवता पूजन, तर सकाळी ८:४५ वाजता ह.भ. प. श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूर्ण होती महापूजा व महाआरती होणार आहे. तर वे.शा.स. नराश्याम महाराज येवतीकर यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण होणार आहे त्यानंतर सकाळी ९:३० वाजता ते १०:३० पर्यंत ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन असून ठीक सकाळी ११:०० वाजता पासून महाप्रसादात सुरुवात होणार आहे.
तरी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर संस्थान व बापू मार्केटच्या सर्व सभासदाकडून करण्यात आले आहे.