पोलीस समस्यांच्या मोर्चामध्ये सामान्य जनतेला व पोलीस कुटुंबाला उतरण्याचे आवाहन.

नागपूर प्रतिनिधी,दि.०६:- पोलीस समस्यांच्या मोर्चामध्ये सामील होण्याचे सामान्य जनतेला पोलीस कुटुंबाला आवाहन  समस्यांच्या मागण्यांसाठी २१-१२-२०२२ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता दुर्गा मंदिर जवळून धंतोली यशवंत स्टेडियम जवळ नागपूर येथून मोर्चा निघणार आहे.

 

 

महाराष्ट्रातील सर्व पोलीस परिवार कुटुंब, रिटायर पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व सर्व जाणत्या नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन, कारण पोलीस हा सर्व जनतेच्या सेवेसाठी २४ तास ३६५ दिवस तत्पर आहे.

 

 

 

 

आम्हाला फक्त त्यांच्यासाठी एक दिवस द्यायचा आहे. खाकी आहे म्हणून आम्ही सुरक्षित घरी आहे आमच्या परिवाराची सुरक्षा करणारे पोलीस यांच्या हक्कासाठी लढणे गरजेचे आहे कारण पोलीस डिपार्टमेंट हा अनुशासन विभाग असल्यामुळे स्वतःसाठी लढू शकत नाही त्यांची संघटना नाही, प्रतिनिधी आमदार नाही म्हणून सामान्य जनतेचे कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभे राहणे कारण ते आमच्या पाठीशी अदृश्य शक्ती प्रमाणे २४ तास ३६५ दिवस कायम उभे असतात.

 

 

 

सकारात्मक व पॉझिटिव्ह विचार करा की जर पोलीस नसता तर समाजाची सुरक्षा कोणी केली असती. आजही आम्ही समाजामध्ये बिनधास्तपणे वावरतो कारण माहित आहे की संकटकाळी धावून येणारा पहिला व्यक्ती म्हणजे तो पोलीस असेल.

 

 

 

याच पोलिसांनी कोरोना काळामध्ये स्वतःच्या छातीची ढाल करून व जीवाची पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्राला सुरक्षेचे कवच पुरवले अनेक परिवारातील पोलीस कर्मचारी यामध्ये मृत्युमुखी पडले पण तरीही न डगमगता पोलिसांनी चौफेर महाराष्ट्रभर सुरक्षा पुरवली.

 

 

 

 

सामान्य माणसांच्या संकटकाळी कुठलीही घटना घडली अनुचित प्रकार घडला चोऱ्या मारिया हाणामारी झगडे भांडण तंटा खून बलात्कार दरोडे काही जरी घडले तरी आम्हाला सर्वात पहिले आठवतो तो पोलीस अशा या मानवी हृदय घेऊन जगणाऱ्या पोलीस व त्यांच्या परिवारांची वेदना म्हणजे पोलिसांची संघटना नाही , त्यांचा प्रतिनिधी आमदार नाही, त्यांचा आवाज उचलणारा कोणी राजनीति करणारा आमदार खासदार लोकप्रतिनिधी प्रतिनिधी नाही.

 

 

 

 

कटाक्षाने व जलद गतीने समस्या सोडवणारे मंत्री नाही, म्हणून सामाजिक बांधिलकी व सामाजिक रुण फेडण्याच्या नात्याने राष्ट्रनिर्माण संघटन नागपूरच्या वतीने सचिव निलेश नागोलकर यांनी बारा वर्षापासून पोलिसांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे व प्रशासन पर्यंत पोहोचण्याचे विषयावर काम सुरू केलेले आहे. २०१५, २०१६, २०१७, २०१८ असे चार वर्षे सतत हिवाळी अधिवेशनावर मोर्चा सुद्धा घेतलेले असून अनेक पोलिसांच्या समस्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे व शासनालाही याची दखल घ्यायला भाग पाडलेले आहे.

 

 

 

त्या करिता महाराष्ट्रातील सर्व पोलीस परिवार कुटुंब, पोलीस बॉईज सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते , सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की नागपूर हिवाळी अधिवेशन वर घेणाऱ्या दी.२१ डिसेंबर २०२२ च्या पोलिसांच्या समस्यांच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे व पोलिसांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *