देगलूर प्रतिनिधी,दि.०७:- परम पूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर येथे आज दिनांक ०६-१२-२०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयातील सह शिक्षिका श्रीमती पांचाळ बाई विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी आंबेडकरांचे चरित्र, त्यांच्या शाळेतील आठवणी , त्यांचे शिक्षण, चवदार तळ्याचा घटना आणि समरसताचे महत्व इत्यादी अनेक स्मृतींना उजाळा दिला. प्रज्ञा, शिल व करुणा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
आध्यक्षिय समारोप प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री केंद्रे सर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. आंबेडकरांचे चरित्र सर्वांनी वाचले पाहिजे आणि बाबासाहेबांचा एक तरी गुण आंगिकरावा आसे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिरलवार सर यांनी केले तर आभार मुगुटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आलुरकर बाई यांनी केले.