गंगाखेड प्रतिनिधी, दि . ०८ :- पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कार्यवाही केली असून त्यांच्याकडुन १२ हजार तिनशे रूपयेंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गंगाखेड शहरातील पोलिसांनी दि. ६ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. यात गणेश उत्तमराव राठोड रा. गोदावरी तांडा, सिध्देश्वर पंडित राठोड रा.गोदावरी तांडा, उत्तम व्यकोबा व्यव्हारे रा. रंगारगल्ली गंगाखेड असे दारू विक्री करणाऱ्याचे नावे आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांकडून शहरात पेट्रोलिंग करत असतांना शहरात मोंढा, जयभवाणी हाँटेल समोर, पोस्ट ऑफिसच्या बाजुस मोकळ्या जागेत जुनी, भाजीमंडई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या देशी दारू विक्री होत असलेली माहीती मिळाली त्यावरून पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी
पथक तयार करून परिसरात गस्तीदम्यान संशयितांची सखोल चौकशी केली असता प्रोव्हीबिशन गुन्हाचा मुद्देमाल स्वतःचे ताब्यात बाळगुन विना परवाना बेकारदेशीर रित्या अवैध चोरटी दारूविक्री करत असतांना मिळुन आले.
या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलिस जमादार लाड बाचेवाड पोलिस नाईक सुग्रीव सावंत यांनी केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. लाड हे करत आहेत.
