योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 

 

नांदेड दि. २१ :- नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेनिमित्ताने गुरूवार २२ डिसेंबर २०२२ रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी २२ डिसेंबर रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. या तपासणी बाबत दिनांक मेसेजद्वारे देण्यात येणार आहे.

 

 

 

 

दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पुढील एक आठवडयापर्यंत स्विकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वाहन मालक-चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *