परभणी, दि. २२ : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज गुरुवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राला जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती ए. जी. सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरवर्षी २४ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या ‘ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे’ (इफेक्टीव्ह डिस्पोजल ऑफ केसेस इन कन्झ्युमर कमिशन) या संकल्पनेवर आधारित चर्चासत्र आहे. पिक विमा, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना तसेच बि-बियाणे या विषयाशी निगडीत तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा करण्याच्या दृष्टिने या चर्चासत्रात चर्चा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील तहसीलदार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण परिषदेचे सदस्य, दक्षता समितीचे शासकीय सदस्य, बार कौन्सिलचे पदाधिकारी-वकील, पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, जास्तीत-जास्त शेतक-यांनी चर्चासत्राला उपस्थ्िाहत राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मुथा यांनी केले आहे.