तिंगेलवार दिपक या विद्यार्थ्यास विद्यापीठाकड़ून सुवर्णपदक

देगलूर प्रतिनिधी,दि. २३:- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील  बी ए तृतीय वर्षाचा विद्यार्थी तिंगेलवार दिपक गंगाधर या विद्यार्थ्यास विद्यापीठाकड़ून राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्णपदक घोषित केले आहे.
विद्यापीठाकड़ून स्वा सैनिक कै. दिपाजी पाटील सुवर्ण पदक प्रदान करण्यात येनार आहे. त्यांच्या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , गंगाधर जोशी, जनार्दन चिद्रावार, रवींद्र
अप्पा द्याडे. देवेंद्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार,कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चमकुडे एम.एम.,प्रसिद्दी प्रमुख डॉ. बी. आर .कत्तुरवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी व प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थ्यानी तींगेलवार दिपक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ रत्नाकर लक्षटे, डॉ माधव चोले यांचे आभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *