देगलूर प्रतिनिधी, दि.२३:- नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाच्या आतील मुले या वयोगटातील देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम ठेवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या संघातील खेळाडू कर्णधार साईनाथ आबसवार,आपाराव कोरेवार, ईश्वर डबेवाड,अजय दंतलवाड, गणेश घडे,शेख मुदसिर,सयद बिलाल,सत्यम वाघमारे,हेमनर तातेराव तातेराव,लष्करे संकेत, इनामदार सलमान,अनंत कडलवार, अभिजित कठारे या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून क्रीडा संचालक डॉ.निरजकुमार उपलंचवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिपक वावधाने .क्रीडा शिक्षक सिताराम हाके श्री मधुकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यांच्या या घवघवित यशाबद्दल खेळाडूंचे अभिनदंन अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , गंगाधर
जोशी, जनार्दन चिद्रावार, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंद्र मोतैवार, चंद्रकांत नारलावार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उप प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.चमकुडे एम.एम.,प्रसिद्दी प्रमुख डॉ. बी. आर .कत्तुरवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी व प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.
