हायवा टिपर चोरणाऱ्या चोरटयांचे रॅकेट उघड ०५ हायवा टिपरसह १,०२,००,०००/- रुपयाचा माल जप्त ०७ गुन्हे उघड

नांदेड प्रतिनिधी,दि. २७ :- माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.
मागील एक वर्षामध्ये नांदेड जिल्हयामध्ये ०७ हायवा टिपर चोरीचे घटना घडल्या होत्या. सदर हायवा टिपर चोरांचे टोळीचा शोध घेणे चालु होते. दि. २५/१२/२०२२  रोजी श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नांदेड जिल्हयातील तसेच हिंगोली जिल्हयातील हायवा टिपर चोरी करणारा एक इसम हा मौजे वांगी ता. जि.
नांदेड येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी श्री व्दारकादास चिखलीकर यांना कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले. पो. नि. स्थागुशा यांनी अधिकारी व अमंलदाराना घेवुन मौजे वांगी येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे लखन अवधुत जाधव वय २२ वर्ष रा. वांगी ता. जि. नांदेड यास पकडुन
विचारपुस करता त्यांनी व त्याचे सोबत १) जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना २) मेहराज सय्यद रा. औरंगाबाद ३) विष्णु आखात रा. जालना ४) प्रभु बामणे रा. जालना ५) लक्ष्मण गाडे रा. पाचोड जि. औरंगाबाद ६) हरी मखमले रा. जालना यांनी मिळुन नांदेड जिल्हयातील ०६ व हिंगोली जिल्हयातील ०१ हायवा टिपर चोरी केले असल्याचे सांगीतले. नमुद टोळीतील चोरटयांचा शोध घेतला असता, १)
जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना २) मेहराज सय्यद रा. औरंगाबाद हे मिळुन आले. चोरी केलेल्या हायवा टिपर पैकी लखन जाधव याचेकडुन ०१, मेहराज सयद याचेकडुन ०२ हायवा टिपर व जनार्धन ऊर्फ गजानन काळे याचेकडुन तोडलेल्या स्थितीतील ०२ हायवा टिपरचे सुटे भाग असे एकुण ०५ हायवा टिपर तसेच चोरीचा गुन्हा करताना वापरलेली स्कॉर्पिओ जिप असा एकुण १,०२,००,०००/- रुपयाचा
माल जप्त करण्यात आला आहे. नमुद टोळीतील इतर आरोपीचा शोध घेणे चालु असुन नमुद टोळीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मिळुन आलेल्या आरोपीना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. ५०५/२०२२ कलम ३७९ भा द वि गुन्हयात तपासकामी देण्यात आले आहे.
नमुद आरोपीतांकडुन १) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. ५०५/२०२२ कलम ३७९ भा द वि २) पो स्टे नांदेड ग्रामीण गुरनं. ३१४/२०२२ कलम ३७९ भा द वि ३ ) पो स्टे हदगांव गुरनं. २९७/२०२२ कलम ३७९ भा द वि ४) पो स्टे रामतीर्थ गुरनं. १८९/२०२२  कलम ३७९ भा द वि ५) पो स्टे देगलुर गुरनं. ५४५/२०२२ कलम ३७९  भा द वि ६) पो स्टे उस्माननगर गुरनं. १९०/२०२२ कलम ३७९ भा द वि ७) पो स्टे वसमत जि. हिंगोली गुरनं. २८५/२०२२ कलम ३७९ भा द वि असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / सचिन सोनवणे,
सपोउपनि / संजय केंद्रे, पोहेकॉ / गंगाधर कदम, पोकों / देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार, रणधीर राजबन्सी, बजरंग बोडके, महेश बडगु चापोकॉ/ अर्जुन शिंदे, शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *