देगलूर प्रतिनिधी दि.०८ :- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित,प.पू. गोळवलकर गुरूजी प्राथमिक विद्यालयातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
गुणवत्ता यादीत कु.सेजल बालाजी सरके हिने ७९% मिळवून २४ व्या तर कु.सृष्टी सूर्यकांत पंचडे हिने ६७% मिळवून१०७ वा क्रमांक मिळविला आहे.दोन्ही मुली शिष्यवृतीधारक झाले.याबद्दल संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष मा.डॉ. सुरेंद्रभाऊ आलूरकर,
कार्यवाह मा. डॉ. हेमंतजी वैद्य, स्थानिक अध्यक्ष मा. चंद्रकांत रेखावार,स्थानिक उपाध्यक्ष मा. प्रा. गिरीशजी वझलवार, स्थानिक कार्यवाह मा. प्रकाशजी चिंतावार स्थानिक सहकार्यवाह मा. गिरीशजी गोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर,विभाग प्रमुख सचिन जाधव व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.