कै.डाॅ. सुशीला एकलारे यांच्या स्मरणार्थ मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आज

 

 

देगलूर प्रतिनिधी,दि.११:-  देगलूर येथील अगदी जुने व प्रसिद्ध डॉक्टर एकलारे मॅडम यांच्या आठवणी प्रित्यर्थ डॉक्टर कपिल एकलारे यांचे संजीवन हॉस्पिटल वुमन स्पेशालिटी हॉस्पिटल व वंध्यत्व निवारण केंद्र यांच्यातर्फे आज दिनांक ११ जानेवारी २०२३ बुधवार रोजी मरखेल येथे स्त्री रोगाची मोफत तपासणी होणार आहे.

तसेच त्यात गंभीर आजार असणाऱ्या आजारावर ऑपरेशनची गरज भासल्यास त्यात रुग्णांना ५०% ची सवलत ही दिली जाणार असल्याचे डॉक्टर कपिल एकलारे यांनी सांगितले आहे.

 

 

शिबीरात होणाऱ्या तपासणी स्त्रीरोग निदान, कर्करोग निदान,मासिक पाळीच्या समस्या,पांढरे पाणी समस्या, गर्भाशय वरील सुज व गाठी व वंध्यत्व निदान वरील सर्व तपासण्या मरखेल येथील शिवकृपा क्लिनिक (डॉ.धमनसुरे) मरखेल येथे करण्यात

 

 

 

 

येणार आहेत. तरी परिसरातील सर्व सुजाण नागरिकांनी आपल्या घरातील स्त्रियांचे तपासण्या करून घेण्यासाठी मरखेल येथे उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर कपिल एकलारे यांनी केले आहे.

रुग्णांची पॅप्स स्मिअर तपासणी मोफत केली जाईल तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *